Friday, September 6, 2013

काय हवय काय नकोय...


तॊ सुर्य नकॊय गं मला,
फक्त तुझा सुवर्णप्रकाश दे.

तॊ चंद्र नकोय गं मला,
तुझी शितल छाया दे.

कुणी माझी काळजी करावी अस मुळिच वाटत नाही ,
फक्त तु मला समजुन घे.

तुझ्यापेक्षा चांगली नकोय गं मला,
फक्त तु हवीयेस मला.

अस अर्ध्यावाटेवर सोडून जाऊ नकोस,
विरह वेदना मनाला माझ्या देऊ नकोस....
                                         chandu's sonchapha...